testimonials

मनोज सर, अतिशय उत्तम प्रकारे शिकवतात एखाद्या विषयावरती ते समजून सांगत असताना त्यातील लहानातली लहान गोष्ट ते नीट समजवतात विद्यार्थ्यांना अगदी सोप्या आणि बोली भाषेमध्ये सर्व गोष्टी शिकवतात मनोज सरांना आपल्या काही शंका सांगितल्यास ते अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या शंकांचा निरसन करतात आणि आपल्याला फोन तसेच इतर माध्यमातून ते आपल्याला नेहमीच सहकार्य करत असतात.

प्रसाद गायकवाड, भोसरी.

एमडीनाईन एज्युकेशनचे प्रमुख मनोज सर हे गेले अनेक वर्षे फोटोशॉपची ट्रेनिंग देत आहेत मी मनोज सरांचा फोटो शॉप चा कोर्स केला आहे त्यानंतर माझ्या फोटो एडिटिंग मध्ये बरीचशी प्रगती झाली तसेच फोटोशॉप मध्ये काही अडचण आल्यास मनोज सर योग्य वेळी मार्गदर्शन करतात किंवा मोठा प्रॉब्लेम असेल तर Anydesk ला  येऊन ते सॉल्व्ह करतात फोटोशॉप शिकवताना मराठी आणि हिंदी भाषा वापरत असल्यामुळे लवकर शिकण्यास मदत झाली.

मॅजिक व्हिजन  फोटोग्राफी ,भोसरी.


सरांची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे. जे काय शिकवलेलं आहे ते स्वतः काम करून अनुभव घेतलं आहे . शिकवण्याची पद्धत आणि पटवून सांगण्याची पद्धत एकदम सोप्या पद्धतीने, समोरच्याला समजला असे, कमीत कमी वेळात शिकवतात . मी सरांकडून घेतलेले कोर्सं एकदम सरळ सोप्या भाषेत सर शिकवतात, सांगण्यासाठी उपयोगाचा आहे फीचर्स पण खूप छान आहे नवीन नवीन पिढीला ते लवकर आकलन होतं समजून घेऊ शकतात आणि जे फोटोग्राफर आहेत त्यांनी हे पुरेपूर घ्यावं, याचा फायदा सर्वांसाठी होईल, सरांबद्बदल सांगण्यासारखं खूप काही आहे ,सरांचे खूप खूप आभार.  हे कोर्स  सर्वांकडे असावा त्यांचे जे लेक्चर आहेत ते सर्वांनी अनुभव घ्यावा ही कळकळीची विनंती सर्वांना.

प्रयाग फोटो स्टुडिओ, विजुभाऊ गोपाळ शेडगे

मनोज सर तुमच्या कडून बरेच काही शिकन्या सारखे आहे . फोटोग्राफी या व्यवसायात फोटो एडिटिंग खूप महत्वाचे आहे आणी या विषयात तुम्ही मास्टर आहात. मी तुमचे व्हिडिओ बघुन् भरपूर शिकले आणि त्यामुळे व्यवसायात चांगले काम करत आहे. तुमचे कोर्सेस मराठी मध्ये असतात म्हणून समजण्यात मदत होते. तुम्ही महिलासाठी जे वोर्कशॉप घेतले त्यातून भरपूर शिकण्यात मदत झाली.तुम्ही तुमच्या कडे असलेले ज्ञान तुमच्या कडे न ठेवता ते दुसऱ्या व्यक्तीला शिकवता सुद्धा हे खूप मोठे काम आहे . तुमचे असेच मार्गदर्शन मिळावे ..तुमचे खूप खूप आभार.

सौ.उषा भटकर ,भावेश फोटो स्टुडिओ,भोसरी

मनोज सरांकडून  खुप काही शिकायला भेटले . सर सरळ आणि सोप्या भाषे मध्ये  सांगतात . मी तुमचे व्हिडिओ बघुन् भरपूर काही शिकलो आणि शिकत आहे.फोटोग्राफी आणि वीडियोग्राफ़ी मध्ये  काही अड़चन असेल सर नेहमी मार्गदर्शन करतात. सरांन चे खुप खुप आभार , धन्यवाद.
सुमित दळवी. द फोटो लाइफ स्टुडियो. आळंदी.

Lorem Ipsum is simply dummy text of the printing industry. — Jane Doe

Reviews and Testimonials

Course Feedback will be displayed here.